Menu

भारतीय पशुधन उदयोग प्रदर्शनी, 
१६ -२ डिसेंबर, २०१५

 

पशुधन व शेती हे परस्परांवर अवलंबून आहेत. भारतात ६०% हून अधिक शेतकरी,
शेतीबरोबरच पशुधन निगडीत व्यवसाय करीत आहेत. विविध आपतींमुळे शेतीमध्ये
होणारे नुकसान भरून निघण्यासाठी अशा व्यवसायाची बहुमुल्य मदत होऊ शकते.

गेली २० वर्षे किसान कृषी प्रदर्शनास आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्यासाठी
मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या सूचना व प्रोत्साहनानुसार भारतीय पशुधन उदयोग
प्रदर्शनाचे आयोजन दिनांक १६ ते २० डिसेंबर, २०१५ रोजी पुणे येथे होत आहे. 

पशुधन २०१५ हे भारतीय शेतकऱ्यांसाठी एक उत्कृष्ठ संधी आहे. या प्रदर्शनाद्वारे
पशुधन व्यवसायासंदर्भातील नवनवीन तंत्रज्ञान व संकल्पना आपल्यासमोर मांडण्याचा
आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.शेतकरी , उदयोजक, शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांना एकत्र आणून
त्यांच्यात माहिती व ज्ञानाची , विचारांची देवाण - घेवाण व्हावी हाच पशुधन २०१५ या
प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.

आपल्या व्यवसायासाठी सर्वार्थाने उपयुक्त ठरणाऱ्या, पशुधन २०१५ प्रदर्शनास आपण
आपल्या मित्रपरिवारासह अवश्य भेट दयावी, यासाठी आपणास हे खास आग्रहाचे निमंत्रण.